डेरा अनुयायांचा हिंसाचार म्हणजे युद्धसदृश स्थितीच-उच्च न्यायालय

चंदीगड -डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम याच्या अनुयायांनी घडवलेला हिंसाचार म्हणजे युद्धसदृश स्थितीच होती. त्याप्रमाणेच ती हाताळली जायला हवी होती, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले.

डेरा अनुयायी सामील असलेल्या हिंसाचारप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या तपासासाठी तीन अधिकाऱ्यांचा समावेश असणारी विशेष पथके (एसआयटी) स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने हरियाणा आणि पंजाब सरकारांना दिला. दरम्यान, पंचकुलामध्ये जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळीबार करण्याऐवजी रबरी गोळ्यांचा वापर करायला हवा होता, अशी भूमिका डेराच्या वकिलांनी मांडली. त्यावर उच्च न्यायालयाने असहमती दर्शवली.

जाळपोळ करण्यासाठी काही लोक पेट्रोल बॉम्ब आणि प्राणघातक शस्त्रास्त्रे घेऊन येत असताना नरमाईची भूमिका घेतली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. विशेष सीबीआय न्यायालयाने बलात्कार प्रकरणी राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर हरियाणाच्या पंचकुला आणि सिरसामध्ये मध्ये हिंसाचार उसळला. त्यात 38 जण मृत्युमुखी पडले. पंजाबच्या काही भागांतही हिंसक घटना घडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)