‘डेडपूल २’ ने प्रदर्शनानंतर फक्त तीन दिवसांतच तब्बल ३३ कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतीय तरुणाईवर या सिनेमाने चांगलीच भुरळ घातली असून, त्याच्या हटके व्यक्तिमत्त्वामुळे तो लोकप्रिय होत असल्याचे बोलले जात आहे.

‘डेडपूल’ हा सुपरहिरो आहे. पण, तो पारंपरिक नाही. शत्रूला पराभूत करण्यासाठी त्याच्यापाशी शस्त्र नाही, तर त्याची हाड नसलेली जीभच पुरेशी आहे. खरे तर डेडपूलचे यश त्यांच्या हटके असण्यातच आहे. डेडपूल म्हणजे नेमके काय असते, समजून घ्यायला हवे. हा मुलांसाठी सुपरहिरो असला तरी आपण आपल्या मुलांना डेडपूल पाहायला सांगू शकत नाही. पण तरीही त्याची अॅक्शन, संवाद यामुळे हा सिनेमा किशोरवयीन मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय होताना दिसतोय. तीन दिवसांत या चित्रपटानं ३३ कोटींची कमाई केली असून, बॉलिवूड सिनेमाच्या तुलनेत त्याची घोडदौड वेगानं सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)