डेटा लिक प्रकरणी सरकारची फेसबुकला नोटीस

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज डेटा लिक प्रकरणी फेसबुक या आघाडीच्या सोशल नेटवर्किंग कंपनीला नोटीस बजावली. युजर्सच्या व्यक्तिगत माहितीचा गैरवापर रोखण्यासाठी कुठली पाऊले उचलली याची माहिती फेसबुककडून मागवण्यात आली आहे. फेसबुक युजर्स डेटा लिक करणाऱ्या ब्रिटनस्थित केंब्रिज ऍनालिटीका या कंपनीला याआधीच नोटीस बजावण्यात आली होती.

आता नोटीस बजावून फेसबुककडून 7 एप्रिलपर्यंत उत्तर मागवण्यात आले आहे. फेसबुकला पाच प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. केंब्रिज ऍनालिटीकाकडून भारतीय मतदार आणि फेसबुक युजर्सच्या व्यक्तिगत माहितीचा वापर केला गेला का, या प्रश्‍नाचाही त्यात समावेश आहे. केंब्रिज ऍनालिटीकावर अनेक देशांच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)