डेक्‍कनच्या दोन्ही संघांची विजयी आगेकूच 

शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब टेनिस स्पर्धा 
 
पुणे  – डेक्‍कन अ आणि डेक्‍कन ब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच केली. पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील साखळी फेरीत प्लेट डिव्हिजन गटातील पहिल्या सामन्यात डेक्‍कन ब संघाने मगरपट्टा ब संघाचा 24-11 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून धनंजय सुजय, इंद्रनील दाते, बाबू जाधव, अमिश आठवले, बाळू जोशी, अमोल बापट, कौस्तुभ शहा व मनोज देशपांडे यांनी अप्रतिम कामगिरी करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
दुसऱ्या सामन्यात नंदन बाळ, अमित पाटणकर, संग्राम चाफेकर, ऋषिकेश पाटसकर, अजय कामत, जयदीप दाते, मंदार वाकणकर व मुकुंद जोशी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्‍कन अ संघाने ओडीएमटीचा 24-3 असा पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.
सविस्तर निकाल – 
साखळी फेरी – प्लेट डिव्हिजन – डेक्‍कन ब वि.वि. मगरपट्टा ब 24-11 (100+ गट- धनंजय सुजय-इंद्रनील दाते वि.वि. प्रदीप मित्रा-रतिश रतुसाविया 6-5(7-3); खुला गट- बाबू जाधव-अमिश आठवले वि.वि. वरुण भटनागर-अमनदीप सिंग 6-0; 90+ गट- बाळू जोशी-अमोल बापट वि.वि. कृष्णा नारायणा-मयूर पारेख 6-3; खुला गट- कौस्तुभ शहा-मनोज देशपांडे वि.वि. रतिश रतुसाविया-प्रदीप जगदाळे 6-3)
डेक्‍कन अ वि.वि. ओडीएमटी 24-3 (100+ गट- नंदन बाळ-अमित पाटणकर वि.वि. उमेश दळवी-ज्ञानेश्वर कारकर 6-2; खुला गट- संग्राम चाफेकर-ऋषिकेश पाटसकर वि.वि. विशाल जाधव-राहुल पाटील 6-1; 90+ गट- अजय कामत-जयदीप दाते वि.वि. राम नायर-अमित धांड 6-0; खुला गट- मंदार वाकणकर-मुकुंद जोशी वि.वि. कौस्तुभ देशमुख-हिमांशू कपटिया 6-0).

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)