डेकोरेशन करणे

‘डेकोरेशन’ याचा अर्थ सामान्यपणे लाइटिंगच्या संदर्भात घेतला जातो. परंतु याचा व्यापक अर्थ “सजावट’ असा आहे. या सजावटीत सर्व प्रकारच्या सजावटीचा समावेश असतो. यामध्ये स्त्रिया आपल्या कलेचे, छंदाचे रूपांतर व्यवसायात करू शकतात. अलीकडे कोणतेही समारंभ अगदी लक्षात राहण्याजोगे व्हावेत यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात व त्यासाठी आवश्‍यक त्या सर्व गोष्टी करतात.

घरगुती समारंभ जसे- बारसं, वाढदिवस, मंगळागौर, डोहाळे जेवण, गेट टू गेदर, वास्तुशांत अशा समारंभांना सजावट करणं. संक्रांतीचं हळदी कुंकू, बाळाचं बोरनहाण या प्रसंगी सुद्धा हल्ली सजावट केली जाते.
प्रत्येक समारंभाचा हेतू वेगळा असतो त्या त्या प्रसंगी योग्य सजावट का होऊ शकेल तशी ती करणं यामध्ये कल्पकता, कलात्मकता असे गुण वापरून हे काम करता येते.

याची प्रसिद्धी तोंडोतोंडी होत असल्याने लोकसंपर्क चांगला ठेवणे आवश्‍यक आहे. आकर्षक व्हिजिटींग कार्ड असावे.
कॉर्पोरेट कंपन्या, इतर संस्थांचे वर्धापनदिन, बक्षीस समारंभ अशा प्रसंगीही त्यांना यथायोग्य डेकोरेशन करून घ्यावे लागते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात रहाणे. अनेक क्‍लब, मंडळे वेगवेगळे प्रसंग साजरे करत असतात त्यांनाही याची गरज असते.
यासाठी लागणाऱ्या वस्तू होलसेल दरानं आणून ठेवणं व त्या व्यवस्थितरित्या जपून ठेवणं आवश्‍यक असतं.
यासाठी पैसे घेताना आपम वापरणार असलेल्या मालाची किंमत, आपला जाणारा वेळ या सगळ्याचा विचार करून मगच ठरवावे.

कार्यक्रमानंतर वापरलेले साहित्य व्यवस्थित काढून ठेवल्यास पुन्हा ते वापरता येते. जे डेकोरेशन आपल्याला विशेष आवडलेलं असेल त्याचा आल्बम करून ठेवल्यास आपल्या कामाची कल्पना येथे व इतरांना दाखवता येतो. व्यवसाय मिळविण्यासाठी कामाचे योग्य सादरीकरण केले पाहिजे.

कोणत्या प्रकारचे मटिरिअल वापरणार, डेकोरेशन करायला किती वेळ लागणार याची कल्पना दिली की आयोजक त्यानुसार इतर गोष्टी ऍरेंज करतात. करायला किती वेळ लागेल याचा अचूक अंदाज स्वतःला असावा.
कामाची तयारी करताना बरोबर सर्व वस्तू घेऊन जाणे. त्यापूर्वी त्याची यादी करणे गरजेचे असते. त्यामुळे आयोजकांचा वेळ वाया जात नाही.

आयोजकांनी स्वतःनी कोणतं सामान आणायचंय याची त्यांना लेखी पूर्व कल्पना देणं उदा. गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठ्या समस्या आणणं इ. म्हणजे ऐनवेळची धावपळ वाचवता येते.
व्यवसाय म्हणून हे करायचं ठरवलं तर ते हौस म्हणून न करता व्यावसायिक पथ्ये पाळूनच करावे.
– डॉ. नीलम ताटके

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)