“डेअरी फार्म’ रस्ता तीन दिवस राहणार बंद

– 29 मे पासून अंमलबजावणी
पिंपरी,  (प्रतिनिधी) – डेअरी फार्मकडून पिंपरीकडे जाताना असणारे रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर 60 हे 29 मे पासून तीन दिवस बंद राहणार आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी हे गेट बंद ठेवण्यात आले आहे. 31 मे रोजी सायंकाळी सहा वाजता हे गेट सुरू करण्यात येणार आहे.

डेअरी फार्मकडून पिंपरी गावाकडे जाणारा रस्ता लष्कराच्या ताब्यातील आहे. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी हा रस्ता उपलब्ध करून दिला आहे. या दरम्यान रेल्वेचे गेट नंबर 60 आहे. हे गेट 29, 30 व 31 मे असे तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान असणाऱ्या लोहमार्गाची दर वर्षी देखभाल-दुरुस्ती केली जाते.

यामध्ये लोहमार्गाचे जॉइंट्‌स तुटलेले आहेत का? जुने खराब झाले असतील, तर नवीन बसविणे आदींसह विविध कामे करून घेतली जातात. तज्ज्ञांकडून योग्य तपासणी केली जाते. प्रत्येक वर्षी देखभाल-दुरुस्तीचे काम असल्यामुळे या कालावधीत नागरिकांना ये-जा करण्यासाठी असणारा रस्ता बंद ठेवला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)