डेंटिस्टकडे गेल्यावर काय अपेक्षा करावी?

रे देवा!! आता दात दुखतोय डेंटिस्टकडे कधी गेलो नाहीये.. तिकडे काय असेल? कसा असेल माहिती नाही. जर तुम्हाला कधी दातदुखीच्या वेदना आल्या नसतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे.
सर्वप्रथम, डेंटिस्टबद्दल जी आपल्या मनातली भीती किंवा उत्सुकता असते ती काढून टाकावी. दुखण्याने भीती वाटणार असेल तर दर सहा महिन्यातून एकदा दात तपासून घ्यावेत. म्हणजे दात दुखण्यामुळे होणारा मनस्ताप टळेल. दुसरा म्हणजे कुठलीही कीड किंवा विकार लवकर आढळून येतो. म्हणजे लवकर उपचार केल्यावर दुखणं उद्भवत नाही.
डेंटिस्टकडे जायला सुरवात कधी करावी, हे जाणून घेण्यासाठी ह्या पुरवणीतला मागच्या मंगळवारचा लेख जरुर वाचा. तुमचा बऱ्याच शंका जरूर दूर होतील. डेन्टीस्टबद्‌द्‌दल असलेल्या शंका, हा एक वेगळाच संशोधनाचा विषयही आहे.
डेंटिस्टशी संवाद कसा सुरु करावा?
सर्व प्रथम डेंटिस्टला फोन करून अपॉइंटमेंट घ्यावी. घरातून निघण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत. स्वच्छ दात तपासायला सोपे असतात. ठरलेल्या वेळेत बरोबर पोचावे. म्हणजे डॉक्‍टरांनी तुमच्यासाठी काढलेल्या वेळात तुम्हाला सगळं विचारता येईल व डॉक्‍टरांना तुम्हाला सगळं समजावून सांगायला पुष्कळ वेळ राहील. अपॉइंटमेंट घेताना फीस विचारून घ्यावी. म्हणजे खर्चाचा अंदाज घेता येतो.
दवाखान्यात गेल्यावर काय होते?
दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला तुमच्या त्रासाबद्दल सर्व काही विचारले जाईल. तुमच्या त्रासाची पूर्ण माहिती डॉक्‍टरांना द्यावी. दातांचा व्यतिरिक्त कुठला आजार असेल तर त्याचे रिपोर्टस व औषधांचे डिटेल्स सोबत घेऊन जावे. डेंटिस्टना सर्व माहिती असेल तर ते तुमची ट्रीटमेंट सानुकूलित (कस्टमाईज) करतील. तुम्हाला कुठल्या औषधाची ऍलर्जी असेल तर तशी माहिती द्यावी. तुमचा तब्येतीच्या इतिहासाबद्दल चर्चा झाली की, तुमचे दात तपासले जातील. दात तपासायला एका विशिष्ठ खुर्ची मध्ये बसावले जाते. डॉक्‍टर त्यांचा उपकरणांनी तुमचे दात व हिरड्या तपासतील. त्रास होणाऱ्या भागाचा एक्‍सरे काढला जातो. हल्ली पुष्कळ नवीन प्रकारच्या एक्‍सरे चा शोध लागला आहे. काही वेळेस डॉक्‍टर तुम्हाला मोठा एक्‍सरे काढायला दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतात. दातांची तपासणी करताना शक्‍यतो दुखत नसते. त्यामुळे शांत चित्ताने तपासणी करून घ्यावी.
तपासणी झाल्यावर काय?
तपासणी झाली कि डॉक्‍टर तुम्हाला उपलब्ध असलेल्या उपचारांचे सर्व पर्याय समजावून सांगतील. सर्व पर्यायांचे फायदे व तोटे सांगतील. प्रत्येक उपचाराचा खर्चही सांगतील. उपचार सुरू असतांना तुम्ही काय पथ्य पळाले पाहिजे, त्याची माहिती जरूर घ्यावी.
अजून काय माहिती पाहिजे?
बऱ्याचदा तुम्ही सांगितलेला त्रास सोबत दुसऱ्या उपचाराची गरज पण असू शकते. तरीही दुसऱ्या लागणाऱ्या उपचारांची माहिती घ्यावी. म्हणजे अचानक होणारा त्रास टळेल.
दिलेली औषध वेळेत घ्यावीत.
सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवाव्यात उपचार संपल्यावर काय लक्षात ठेवावे?
उपचार संपले की दार महिन्यांनी दात तपासून घ्यावेत.
उपचार व्यवस्थित होण्यासाठी लागणारी सगळी काळजी घ्यावी.
दात घासण्याला गत्यंतर नाही. तोंड स्वच्छ ठेवणे हा सर्व दातांचे विकार लांब ठेवण्याचा एकमेव इलाज आहे.
सुरवातीपासून काळजी घेतली तर नंतरचा त्रास वाचतो. लक्षात ठेवा दातांचे सेट देव विनामूल्य देतो. तिसऱ्या सेटचे पैसे भरावे लागतात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)