डेंग्यूतून बरी झालेली श्रद्धा कपूर कामावर रुजू 

ऑक्‍टोबरच्या सुरुवातीला श्रद्धा कपूर डेंग्यूमुळे आजारी पडली होती. त्यामुळे तिला साईना नेहवालच्या बायोपिकचे शुटिंग थांबवायला लागले होते. आता श्रद्धा डेंग्यूमधून पूर्ण बरी झाली आहे आणि लवकरच ती साईनाच्या बायोपिकच्या शुटिंगला पुन्हा सुरुवात करणार आहे. ही तिच्या फॅन्ससाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आहे. स्वतः श्रद्धाने ट्विट करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. “मी बरी झाली आहे आणि पुन्हा शुटिंगवर रुजू झाली आहे. माझा परिवार आणि माझे चाहते हेच माझे बॅक बोन आहेत. त्यांच्याच पाठिंब्याच्या आधारे मी बरी होऊ शकली आहे.’ असे श्रद्धाने म्हटले आहे.

ती काम करत असलेल्या सिनेमाच्या युनिटनेही तिला दिलेल्या शुभेच्छांबद्दल तिने सर्वांचे आभार मानले आहेत. एक महिनाभर घरी राहिल्यानंतर घरच्यांसोबत राहण्याचा आनंद आपल्याला मिळाला असल्याचेही तिने म्हटले आहे. ती घरी असतानाच्या काळात सिनेमाचे शुटिंग थांबले नव्हते. या काळात साईनाच्या बालपणच्या काळातील शुटिंग पूर्ण करण्यात आले होते. श्रद्धाचा यापूर्वीचा “स्त्री’ खूपच यशस्वी झाला होता. “बत्ती गुल, मीटर चालू’ने काही खास धंदा केला नाही. पण आता “साईना’कडून श्रद्धाला खूप अपेक्षा आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)