डेंगूने अवसरी बुद्रुकच्या युवतीचा मृत्यू

मंचर (प्रतिनिधी) ः ठाणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चात अग्रस्थानी असलेली अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील तेजस्विनी दत्तात्रय चव्हाण (वय 19) हिचे नुकतेच ठाणे येथील लोकमान्यनगर येथे डेंगूने मृत्यू झाला. आंबेगाव तालुक्‍यात स्वाइन फ्लूने नुकतेच दोघांचा मृत्यू झाला होता. आता डेंगूने एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
तेजस्विनीच्या स्मरणार्थ अवसरी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. तसेच स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तेजस्विनीच्या मागे आई, वडील, एक बहिण असा परिवार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय नथुजी चव्हाण हे तिचे वडील होत. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मोर्चात तेजस्विनीने मराठा युवतींचे नेतृत्व केले होते. ठाणे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाची रणरागिणी अशी तिची ओळख होती. सध्या ती एअर होस्टेसचे शिक्षण घेत होती. तिच्या निधनानंतर आंबेगाव तालुक्‍यात प्रथमच शिवपिंडदान विधी करण्यात आला. यावेळी जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल बांगर, ह. भ. प. गणेश महाराज फडतरे यांनी शिवपिंडदान या विषयावर समाजाला प्रबोधन केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच पवनकुमार हिले, उपसरपंच सचिन हिंगे, तेजस्विनीचे वडील दत्तात्रय चव्हाण, बहिण पल्लवी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण, कल्याण हिंगे पाटील उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)