डेंगीसदृश आजाराने विद्यार्थीनीचा मृत्यू

टाकळीभान – येथे सहावीमध्ये शिकणाऱ्या बारा वर्षाच्या विद्यार्थीनीचा डेंगीसदृश आजाराने मृत्यू झाला. तर तीन वर्षाच्या बालकाला डेंगीची लागण झाल्याने उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले आहे. दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने केवळ, उपचाराअभावी विद्यार्थीनीचा मृत्यु झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

शेवटी उपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याने नगर येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल केले, मात्र तपासणीत रुग्ण मयत झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले. गेल्या पाच सहा वर्षापुर्वीच कावेरी हिच्या वडीलांचे निधन झाले. याच परीसरातील तीन वर्षे वयाच्या बालकास डेंगी आजाराने पछाडल्याने नगर येथील खासगी रूग्णालयात हलविले. महिनाभरापासून टाकळीभान येथे डेंगीसदृश आजाराने थैमान घातले आहे. गेल्या पंधरवाड्यात चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता.

ग्रामपंचायतीकडून औषध फवारणीचा केवळ फार्स

टाकळीभान येथे वाढलले गवत, काही ठिकाणी साचलेल्या उघडया गटार नाल्या यामुळे गेल्या काही दिवसांपासून डांसाचा प्रादुभाव झाला. डेंगीसदृश आजाराने गेलेल्या पहिल्या बळीनंतर ग्रामपंचायतीने औषध फवारणीचा गाजावाजा केला, मात्र फवारणीचा केवळ फार्स ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)