डॅरेन लेहमन ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षकपद सोडणार?

सिडनी : बॉल टॅम्परिंगचा वाद काही केल्या संपताना दिसत नाही. कारण स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आले. डेव्हिड वॉर्नरलाही ऑस्ट्रेलिया संघाचे उपकर्णधारपद सोडावे लागले. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादमध्ये त्याच्या कर्णधारपदाबाबत अद्याप साशंकता आहे.

या वादात आता ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्यावर गाज पडण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याआधी लेहमन प्रशिक्षकपदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे. बॉल टॅम्परिंगच्या वादानंतर डॅरेन लेहमन प्रशिक्षकपद सोडू शकतात.

ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)