डुडुळगावात मायलेकाची आत्महत्या

पिंपरी – मायलेकाने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीत बुधवारी (दि. 26) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, डडुडुळगाव येथे फॉरबिया फार्म हाऊसच्या पाठीमागे वनविभागाच्या हद्दीत झुडपांमध्ये दोन मृतदेह असल्याची माहिती एका नागरिकाने दिघी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता एक स्त्री व एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मृतदेहाच्या आसपास पाहणी केली असता त्यांच्याकडे एक चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये मी आणि माझी आई स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत. याबाबत कोणाला जबाबदार धरू नये असे लिहले होते. तसेच पत्नीला काही पैसे दिले असल्याचाही उल्लेख होता. दरम्यान चिठ्ठीव्यतिरिक्त त्याच्याकडे कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रे न सापडल्याने दोघांची ओळख पटू शकली नाही. मृतदेहाजवळ रोगर कीटकनाशकाच्या बाटल्या आढळल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)