डुक्‍कर पकडा मोहिमेत पोलिसही लागणार कामाला

बारा पथकांची नेमणूक : महिनाभर चालणार मोहीम

पुणे – पालिका आयुक्‍तांनी डुक्‍कर पकडण्याचे आदेश दिल्यानंतर आता सर्वच अधिकारी कामाला लागले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांबरोबर आता या मोहिमेत पोलिसांनाही चांगलेच काम लागले आहे. डुक्‍कर पकडताना काही नागरिकांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून पोलीस संरक्षण घेण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे.

औंध-बाणेर, घोले रोड, वारजे-कर्वेनगर, कोथरुड-बावधन, सिंहगड रोड, वानवडी-रामटेकडी, हडपसर-मुंढवा, येरवडा-कळस-धानोरी आदी सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रत्येकी एक वाहन तसेच दहा सेवक या कामासाठी लावण्यात आले आहेत. ही कारवाई करत असताना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर पोलिसांचाही बंदोबस्त मागविण्यात आला आहे. ही कारवाई 10 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्‍टोबरपर्यंत करण्यात येणार आहे.

शहरात अनेक डुक्‍कर पाळणाऱ्या तसेच डुक्‍कर पळविणाऱ्या टोळ्या आहेत. या टोळ्यांच्या माध्यमातून डुक्‍करे सोडणे, त्यांना पकडणे आदी कामे केली जातात. यामुळे डुक्‍करांची संख्या वाढते. यांना कायद्याने बंदी असली तरीही या टोळ्या कार्यरत आहेत. अधिकारी कारवाई करण्यास गेले असता अशा टोळ्यांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळेच पोलिसांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, यासाठी बारा पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून पकडण्यात येणारी डुकरे ही कोंडवाड्यात ठेवणार असून नंतर ती कत्तलीसाठी कत्तलखाण्यात पाठविण्यात येणार आहेत.

शहरात जवळपास दहा हजार डुकरे
शहर व उपनगरांसह एकूण डुकरांची संख्या ही दहा हजारांच्या आसपास असल्याचे पालिकेतील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. हडपसर-मुंढवा परिसरात ही संख्या अधिक आहे. मोकाट डुकरे पकडण्यानंतर त्यांना मुंढवा-केशवनगर येथील आरक्षित असलेल्या मोकळ्या जागेतील गोठ्यांत करण्यात येणार आहे. त्याआधी ही जागा स्वच्छ करून जंतुनाशक फवारणी करून कंपाउंड लावण्यात येणार आहे. या ठिकाणी डुकरांना खाण्यासाठी घनकचरा विभागाकडून हॉटेलमधील वाया गेलेले अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच डुकरांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे सुरक्षा रक्षक पुरविण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)