डुक्करमुक्त पुण्यासाठी “कायद्याचा आधार’

अडचणी येण्याची शक्‍यता : महापालिकेकडून वकिलांची होणार नेमणूक

पुणे – डुक्करमुक्त पुण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून येत्या 10 सप्टेंबरपासून “डुक्कर मुक्त पुणे’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहीमेत कायदेशीर अडचणी येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून खास वकिलांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच, या मोहीमेसाठी पालिका प्रशासनाने जाळ्यांची खरेदी, पकडलेली डुक्करे ठेवण्यासाठीची जादा व्यवस्था केली असून मुंबईतील एका कत्तलखान्याशीही पालिका प्रशासनाकडून चर्चा करण्यात आली आहे.

मागील महिन्यात झालेल्या मुख्यसभेत शहरात डुक्करांचा सुळसुळाट झाला असून त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने मोकाट डुक्करे पकडण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 10 सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू होणार आहे. त्यासाठी पालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांकडील कर्मचारी यंत्रणा काम करणार आहे. डुक्करे पकडण्यासाठी 5 लाखांच्या जाळ्यांच्या खरेदीसही आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पकडलेली डुक्करे ठेवण्यासाठी मुंढवा येथे जागेची व्यवस्था करण्यात आली असून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईतील एका कत्तलखाना चालकांशीही पालिकेने चर्चा केली आहे. त्याचबरोबर अनेकदा डुक्करे पकडताना काही संघटना, संस्था त्यास विरोध करतात, त्यामुळे असा पेच उभा राहून कारवाई थांबू नये यासाठी वकिलांची विशेष व्यवस्था असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
10 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)