“डुक्करमुक्त पुणे’ मोहीम आजपासून

पोलीस बंदोबस्तात पालिका राबविणार मोहीम : वकिलांची फौजही तैनात

पुणे – महापालिकेकडून शहर डुक्करमुक्त करण्यासाठी आजपासून “डुक्करमुक्त पुणे मोहीम’ राबविण्यात येणार आहे. पुढील महिनाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून दहा स्वतंत्र पथके करण्यात आली असून, त्यात घनकचरा विभाग, अतिक्रमण विभाग आणि पोलिसांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त महापालिकेने ही मोहीम सुरू केल्यानंतर डुक्कर व्यावसायिक न्यायालयात जाण्याची शक्‍यता असल्याने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पालिकेने स्वतंत्र वकिलांची नियुक्ती केली असून त्यांना ही मोहीम सुरू असताना महापालिकेत उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्वाधिक मोकाट डुकरांचा सुळसूळाट हडपसर भागात असल्याने या ठिकाणाहून ही मोहीम सुरू केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शहर डुक्करमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून डुक्करमुक्त पुणे मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, पालिकेकडून हद्दीत मोकाट डुकरे भटकताना आढळल्यास ती पकडून मारण्यात येणार असल्याचे जाहीर प्रकटनही देण्यात आले होते. त्यानुसार, सोमवारपासून ही मोहीम प्रत्यक्ष सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, ही पकडण्यात आलेली डुकरे मारून टाकण्यात येणार असली तरी, त्यांना मारण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात सुविधा महापालिकेकडे नसल्याने या डुकरांना पकडून मुंढवा येथील गोठ्यांच्या जागेमध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवले जाणार आहे.

अशी आहे महापालिकेची तयारी
1) प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 10 कर्मचाऱ्यांचे पथक
2) प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त
3) पुढील महिनाभर राबविणार मोहीम
4) पकडलेली डुकरे मुंढवा येथील गायरान जागेत ठेवणार
5) प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 2 लाखांच्या जाळ्यांची खरेदी
6) न्यायालयात तक्रार गेल्यास वकील पूर्णवेळ उपस्थित ठेवणार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)