डुंबरवाडीत काकडा सोहळा भक्तीमय वातावरणात सुरू

ओतूर- ओतूरजवळील डुंबरवाडी येथे कार्तिक स्नान काकड आरती सोहळा भक्तिमय वातावरणात सुरु आहे. डुंबरवाडी येथे श्रीदत्त मंदिरात आश्विन पौर्णिमेपासून (कोजागरी पौर्णिमा) त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकड आरती करण्याची पद्धत प्रचलित आहे. भाविक भल्या पहाटे मंदिरामध्ये जमतात. यावेळी पांडुरंगाच्या मूर्तीस स्नान घालून वस्त्रालंकारांनी विभूषित केले जाते. टाळ मृदंगाच्या गजरात अभंग आळवले जातात. यामध्ये अभंग, भूपाळ्या, वासुदेव, जागल्या, जोगी, आंधळा-पांगुळ, गौळणी, मागणे, पसायदान आदी अभंग प्रकारांचे पहाटेच्या शांत वातावरणात मनोभावे सुस्वर गायन केले जाते. या आरतीला सेवेसाठी नित्यनियमाने उत्तम आरोटे, तुकाराम डुंबरे, तबाजी आरोटे, गणपत आरोटे, श्रीकृष्ण आरोटे, शांताराम डुंबरे, शंकर डुंबरे, आणि ग्रामस्थ उपस्थित असतात. काकड आरतीची सांगता त्रिपुरी पौर्णिमेस दीपोत्सव, महाकाकड आरती आणि अन्नदानाने होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)