डी. वाय. महाविद्यालयात “वॉटर ऑलिंपियाड’

पिंपरी – रोटरी क्‍लब सिंहगड रोड, जाणीव युवा फाउंडेशन पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने “वॉटर ऑलिंपियाड 2019′ या उपक्रमाचे उद्‌घाटन डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन यांच्या हस्ते शनिवारी (दि. 29) करण्यात आले.

डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शांताई सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमास ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक डॉ. फिलीप बेल, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, डॉ. श्रीकांत पाटणकर, सतीश खाडे, विराग वानखेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वढई, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. अशोक मोरे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जगापुढे पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे. येत्या काळात हा प्रश्न फार बिकट होणार आहे. तो सोडवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व जनजागृती शिवाय पर्याय नाही. या पार्श्‍वभूमीवर “वॉटर ऑलिंपियाड’ या उपक्रमाअंतर्गत प्रकल्प स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, कन्सेप्ट प्रेझेंटेशन, पोस्टर, लघु चित्रपट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व नेदरलॅंड विद्यापीठात एम. एस. करण्यासाठी 37 लाखांची “स्कॉलरशिप’ दिली जाणार आहे. सूत्रसंचालन प्रा. स्मिता पाटसकर यांनी केले. डॉ अशोक मोरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)