डी मार्टमध्ये मॉकड्रीलची थरारक प्रात्यक्षिके

मलकापूर :  मॉलमधून अतिरेक्यांना जायबंद करुन बाहेर आणताना पथकातील अधिकारी व कमर्र्चारी.

मलकापूरला पोलीस छावणी ; दीड तासात गुन्हेगारांना जायबंद

कराड, दि. 6 (प्रतिनिधी) – मलकापूर या वर्दळीच्या ठिकाणी रविवारी सायंकाळी कराड शहर पोलिसांनी मॉकड्रिल करत थरारक प्रात्यक्षिक राबवल्याने मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या लोकांची धांदल उडाली. पोलीसांचा फौजफाटा पाहून मॉलमध्ये काही तरी मोठा प्रकार घडला असल्याची जाणीव नागरिकांना झाली. मात्र दीड तास सुरु असलेले पोलीसांचे हे मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांना हायसे वाटले. गर्दीच्या ठिकाणी गुन्हेगार घुसल्यास त्यांना कसे पकडता येईल, याचे प्रात्याक्षिक शहर पोलिसांनी केल्याने याठिकाणी पोलीस छावणीचे स्वरुप तयार झाले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर येथे रविवारी सायंकाळी डी मार्टमध्ये अतिरेकी हल्ला झाल्याचे प्रात्यक्षिक राबवण्यात आले. अतिरेक्यांनी सामान्य नागरिकांना ओलीस ठेवल्यास पोलिसांनी काय-काय उपाययोजना कराव्यात, याचे थरारक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी मॉलच्या बाहेर अचानकपणे पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. यामध्ये शहर पोलीस, जलद कृती दल, दंगा काबू पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक यांचा समावेश होता. कोणत्या पथकाने काय काय करावे, याच्या पूर्वीच सुचना देण्यात आल्यामुळे या वेगवेगळ्या पथकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडत प्रात्यक्षिक केले. मॉलमधे अतिरेकी घुसल्यास सर्वसामान्यांना त्रास न होता अतिरेक्यांना कसे जायबंद करायचे याचे दीड तास प्रात्यक्षिक झाले. यावेळी पोलिस यंत्रणेने वाहतूक नियमन, गर्दीवर नियंत्रण, सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत न होता कृती कशी करता येईल याचे नियोजन केले. या प्रात्यक्षिकाचे प्रत्येक अपडेट नोंद केले जात होते.
या प्रात्यक्षिकात उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांचेसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक चंदनशिव, राखीव बलचे पांडे , डॉगस्कॉडचे शिंदे, तळबीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांचेसह सुमारे शंभर कर्मचारी, महिला पोलीस सहभागी झाले होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)