डी-मार्टच्या भेसळखोरीविरुद्ध भाजप आक्रमक

तीव्र आंदोलनाचा इशारा : व्यवस्थापनालाही निवदेन

पुणे – डी-मार्ट कंपनीच्या रिटेल आऊटलेटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांमध्ये भेसळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. कंपनीने त्वरीत आपल्याकडील विक्रीस उपलब्ध असणारा भेसळ माल काढून टाकावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप कार्यकारिणी सदस्य राधेश्‍याम शर्मा यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डी-मार्टच्या पुणे आणि कोल्हापूर येथील आऊटलेटमध्ये विक्री असणाऱ्या गुळ आणि हळदीमध्ये भेसळ असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यानंतर प्रशासनाने कंपनीच्या आऊटलेटवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे जो माल विक्रीसाठी उपलब्ध आहे, तो सर्व माल शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे.

याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपचे राधेश्‍याम शर्मा यांनी तातडीने बाणेर येथील डी-मार्टच्या आऊटलेटमध्ये जात तेथील विक्री व्यवस्थापनाला भेसळयुक्त माल न विकण्याबाबत निवेदन दिले. त्याचबरोबर अशा प्रकारचा भेसळ माल काढून टाकण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासमेवत भाजपचे सुनील हंगवणे, राम पांढरे, भगवान भुतडा आणि भाऊसाहेब मते उपस्थित होते. त्याचबरोबर या निवेदनाची एक प्रत पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सुद्धा देण्यात आली आहे. बापट यांनी याप्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)