डी. एस. कुलकर्णी यांच्या जामिनावर 31 मार्च रोजी सुनावणी

पुणे, दि. 23 – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले प्रसिध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्या जामीन अर्जावर ठेवण्यात आलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कुलकर्णी दाम्पत्याच्या जामीन अर्जावर 31 मार्च रोजी विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कुलकर्णी दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर कुलकर्णी दाम्पत्याकडून न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. सुरूवातील सरकार पक्षाने जामीन अर्जावर म्हणणे मांडण्याची मुदत मागितली होती. त्यानंतर कुलकर्णी यांच्या मालमत्तेची विक्री करण्यास परवानगी देऊ नये. कारण राष्ट्रीय कंपनी लवादाने 13 मार्च रोजी कुलकर्णी यांच्यासह सोळा व्यक्तींच्या मालमत्ता विक्री करू नयेत, असे आदेश दिले असल्याचे विशेष सरकारी वकील ऍड. प्रवीण चव्हाण यांनी विशेष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर आज बचाव पक्षातर्फे पुढील तारिख मागण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली.
यासंदर्भात तपास आधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश मोरे म्हणाले, राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडून कुलकर्णी यांच्या मालमत्तेची विक्री करु नये, असे आदेश दिले आहेत. जोपर्यंत पुढील आदेश मिळत नाही. तोपर्यंत त्यांच्या जामिनावरील पुढील सुनावणी होऊ शकत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)