डी.एस.कुलकर्णीच्या मुलाच्या खात्यात गुंतवणूकदारांचे पैसे

पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकेनंतर आता त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. त्याच्या बॅंक खात्यात गुंतवणूकदारांचे 163 कोटी रुपये जमा करून त्याचा उपयोग मनमानी पद्धतीने आणि वैयक्तिक मालमत्ता खरेदीसाठी केलाचा दावा करुन पोलिसांनी त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला आहे.

गुंतवणूकदारांच्या दोनशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. त्याच एफआयआरमध्ये शिरीषही आरोपी असल्याने त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. याविषयी न्या. साधना जाधव यांच्यासमोर सुनावणीस झाली. गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या रकमेपैकी 163 कोटी रुपये हेमंती यांच्या बॅंक खात्यातून शिरीषच्या खात्यात वळवण्यात आले. यापैकी 34 कोटी रुपयांचा उपयोग करून पुण्यातील हवेली तालुक्‍यातील टाकवी येथे जमीन खरेदी करण्यात आली आणि नंतर तीच जागा डीसके यांच्या डीएसके मोटर्स कंपनीला प्रतिमहा 48 लाख रुपये भाड्याने देण्यात आली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)