डीवायएसपींकडून ट्रॅफीकवाल्यांचे कौतुक आणि कानपिचक्याही

सौजन्याने बोलण्यासह उध्दट वर्तन टाळण्याची सूचना
कराड, दि. 6 (प्रतिनिधी) – वाहतूक शाखेच्या काही कर्मचार्‍यांकडून सामान्यांशी उध्दट वर्तन होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचार्‍यांची दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली. कोल्हापूर परिक्षेत्रात वाहतूक कारवाईबाबत सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल कराड उपविभागाच्या झालेल्या सन्मानाबद्दल वाहतूक शाखेच्या कामाचे कौतुक करतानाच वाहनधारकांशी सौजन्याने बोला, उध्दट वर्तन टाळा, हुज्जत घालू नका, अशा शब्दांत ढवळे यांनी ट्रॅफीकवाल्यांचे कान उपटले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा चार्ज घेतल्यानंतर नवनवीन संकल्पना राबविण्यास प्रारंभ केला आहे. परिणामी वाहतूक शाखेने कात टाकली. मात्र, काही कर्मचार्‍यांच्या उपद्व्यापामुळे वाहतूक शाखेबद्दल तक्रारी वाढत होत्या. नागरीक थेट मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रारी करत होते. यामुळे उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दोन दिवसांपूर्वी वाहतूक शाखेतील कर्मचार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत प्रारंभी कोल्हापूर परिक्षेत्रात वाहतूक शाखेने केलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. तसेच या कामगिरीत सातत्य राखण्याबाबत मार्गदर्शन करून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून करण्यात येणार्‍या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासही सांगितले.

ट्रॅफीकचे सूतक खाकीला…
वाहतूक शाखेच्या भानगडींवर दै. प्रभातच्या लेखमालेतून प्रकाशझोत टाकण्यात आला. यामुळे ट्रॅफीक शाखेतील काही जणांची चांगलीच तंतरली. त्या कर्मचार्‍यांच्या बाजूने काहींनी युक्तिवादही केला. मात्र, संबंधितांचे कारनामे सांगितल्यानंतर युक्तिवाद करणार्‍यांचीही बोलती बंद झाली. मात्र, ट्रॅफीकवाल्यांच्या बचावासाठी खाकीवाल्यांनी पुढे येण्याचे कारण मात्र कळू शकले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)