“डीबीटी’ वाटपात दिरंगाई; अधिकाऱ्यांची कान उघाडणी

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडून दखल
खडसावल्यानंतर 60 टक्के लाभार्थ्यांना मिळाले अनुदान
…………………..
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 23 – यंदा डीबीटीची योजना चांगलीच लांबली आहे. मे महिना संपत आला तरीही अद्याप डीबीटीचे अनुदान वाटप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी विशेष लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना खडसावल्यानंतर आतापर्यंत 60 टक्के लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले असून, कृषी विभाग आघाडीवर आहे. दरम्यान, अन्य लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदान जमा होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात वैयक्तीक लाभाच्या योजाना (डीबीटी) राबविली जाते. 2017-18 या आर्थिक वर्षात डीबीटीचा आतापर्यंत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सर्व पंचायत समित्यांमध्ये 7 हजार 950 नागरिकांचे डीबीटीचा निधी मंजूर झाले आहे. त्यातील 4 हजार 256 नागरिकांना आतापर्यंत प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. या लाभाच्या योजनेमध्ये कृषी आणि पशुपालन, महिला आणि बालकल्याण आणि समाजकल्याण विभागाकडून ही डीबीटी प्रक्रिया राबविण्यात येते. त्यामध्ये जिल्ह्यातील गरजू नागरिकांना आवश्‍यक शेतीपूरक साधणे तसेच लघुउद्योगासाठी आवश्‍यक वस्तुंसाठी अनुदान दिले जाते. तसेच महिलांसाठी महिला आणि बालकल्याण विभागाकडून पिठ गिरणी आणि शिलाई मशीनसह विविध वस्तूंचे वाटप केले जाते. त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जिल्ह्यातून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो.

2017-18 या आर्थिक वर्षात या योजनेला झालेल्या दिरंगाईमुळे त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. वर्षाअखेरपर्यंत लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारत, लाभार्थ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळावे यासाठी तातडीने नियोजन केले. त्यामुळे आतापर्यंत किमान 4 हजार 256 जणांना अनुदान मिळाले; तर अन्य लाभार्थ्यांनाही लवकरच अनुदान दिले जाईल. दरम्यान, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता 2018-19 या आर्थिक वर्षांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी डीबीटीचे वेळापत्रकच जाहीर केले असून, त्यानुसार डीबीटीचे वितरण होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षांनी देखील दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. नागरिकांना डीबीटी अनुदानासाठी बॅंक खात्यामुळे अनेक अडचणींना सामोर जावे लागले, त्याचबरोबर खरेदीच्या पावत्यांमुळे देखील अनेक ठिकाणी संभ्रमावस्था निर्माण झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)