डीबीटी योजनेत 2 हजार 809 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर

अपात्र उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी 5 आक्‍टोबरची दिली मुदत

पुणे – जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून राबविण्यात येणारी वैयक्तिच्या लाभाची योजना (डीबीटी) अंतिम टप्प्यात आली असून, आत्तापर्यंत 2 हजार 809 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर, अपात्र उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी 5 ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ही सुवर्णसंधी असून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके यांनी केले आहे. दरम्यान, प्रस्ताव मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना वस्तू खरेदीसाठी सूचना देण्यात येणार असल्याचेही शेळके यांनी सांगितले.

-Ads-

ग्रामीण भागातील महिलांना घरबसल्या व्यवसाय करता यावा तसेच व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीटी योजना राबविली जात आहे. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाकडून यावर्षी 2018-19 मध्ये डीबीटीअंतर्गत महिलांना व्यवसायाभिमुख वस्तू म्हणून शेवई मशिन, शेळी पालन आणि ब्युटीपार्लरचे साहित्य देण्यात येणार आहे. तसेच एमएससीआयटी झालेल्या मुलींना आणि बारावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींना अनुदान देण्यात येणार आहे.
त्यामध्ये शेवई मशिनसाठी 770 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, त्यामध्ये सर्वाधिक लाभार्थ्यांची संख्या इंदापूर, दौंड, जुन्नर भागातील आहे. शेळी पालनमध्ये प्रत्येक लाभार्थ्याला दोन शेळी आणि एक बोकड यासाठी अनुदान देण्यात येणार असून, त्यासाठी 1 हजार 237 प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक इंदापूरमध्ये 388 लाभार्थी आहेत. तसेच ब्युटीपार्लर साहित्यासाठी 343 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. संगणक आणि विशेष प्राविण्यासाठी प्रत्येकी 409 आणि 50 प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली.

डीबीटीअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार तालुका आणि गावपातळीवर अधिकारी, सदस्य यांच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देऊन अर्ज मागवण्यात आले आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असून, निधीही वाढवण्यात आला आहे. बहुतांश विभागाचे डिबीटीचे काम अंतीम टप्प्यात असून, दिवाळीपर्यंत हे लाभ लाभार्थ्यांना मिळतील.
– विश्‍वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)