डीपी पेटल्याने वीज पुरवठा खंडीत

पिंपरी – महावितरण कंपनीच्या इलेक्‍ट्रिक डीपीने अचानक पेट घेतला. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन शेजारी झुलेलाल टॉवरमधील इलेक्‍ट्रिक डीपीला दुपारी बाराच्या सुमारास अचानक आग लागली. संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. डीपीला लागलेल्या आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा काही वेळेसाठी खंडित करण्यात आला होता. आगीचे नेमके कारण समजले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जळालेला डीपीतील बिघाड दुरुस्त करुन या परिसराचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)