डीपीला वेलींचा विळखा

कुसूरमध्ये वीज वितरणचा निष्काळजीपणा

ढेबेवाडी, दि. 25 (वार्ताहर) -कुसूर, ता. कराड येथील शेती पंपांना वीज पुरवठा करणार्‍या वांगनदी जवळील मुख्य डी. पी. बॉक्स व वीज वाहक तारांना वेलींनी गुरफटले असून संपूर्ण डीपीचा परिसर वेलींनी गुरफटला आहे. गुरफटलेल्या वेलींनी शॉर्ट सर्किट होऊन अनेक वेळा शेतकर्‍यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणावरील फ्युज बॉक्सचे दोन्ही दरवाजे तुटले असून यामधील फ्युजा तुटलेल्या आहेत. यामुळे शॉर्ट सर्किटमुळे वीज पंप जळून लाखो रुपयांचे नुकसान फक्त विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाले असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.
वेळोवेळी कोळेवाडी येथील विज वितरण कार्यालयात तक्रार देऊनही कोणतीही उपाययोजना किंवा झुडपे, वेली काढण्याचे धाडस संबधित यंत्रणेकडून केले गेले नाही. तरी संबधित यंत्रणेने वेळीच लक्ष घालून ही वेली, झुडपे काढण्यात यावी, वेलींनी गुरफटलेल्या तारा यामुळे शॉर्ट सर्किट होऊन वीज पंपाना शॉक लागण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. ही डीपी मुख्य शेतातील रस्त्यालगत असल्या कारणाने मोठी रहदारी असते. त्यामुळे रात्री-अपरात्री येथूनच शेतकर्‍यांना यावे लागते. यामुळे कोणत्याही क्षणी जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधितांनी वेळीच लक्ष घातले नाही तर कोणत्याही क्षणी अपप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वेळीच लक्ष घालून संबंधित यंत्रणेने ही झुडपे, वेली काढाव्यात, अशी मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)