डीजेचा वापर केल्यास कठोर कारवाई

जेजुरी- सार्वजनिक उत्सवात डीजेचा वापर म्हणजे एक प्रकारचा उन्माद असून जेष्ठ नागरिक, रुग्ण व नागरिकांना याचा मोठा त्रास होतो. त्यामुळे उत्सवात डीजे ऐवजी समाज उपयोगी उपक्रम राबवणे गरजेचे आहे. डीजेचा वापर केल्यास मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिला.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगाव पाटील यांनी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या. तसेच उत्सवात नियम पाळण्याचे आवाहन केले. यावेळी माने म्हणाले की, सर्वसामान्य जनतेच्या वर्गणीतून उत्सव साजरा केला जातो. परंतु, त्याचा त्रास सर्वसामान्यांनाच होत आहे. डीजेचा लावण्यापेक्षा समाजासाठी विधायक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी व डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच सर्व मंडळांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घ्यावी. उत्सव काळात कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने उत्कृष्ट गणेश मंडळांना गणराया ऍवार्ड देण्यात येणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगाव पाटील यांनी मागील वर्षी गणेशत्सोव मिरवणुकीत वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच्या तक्रारी वरिष्ठापर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे चार मंडळांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक जयदीप बारभाई, अजिंक्‍य देशमुख, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, सतीश घाडगे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे नियोजन पोलीस कर्मचारी संदीप कारंडे, कुलदीप फलफले, भूषण कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन नितीन राउत यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)