डीएसके यांना आता “महारेरा’चा दणका

फ्लॅटधारकाचे एका महिन्यात परत करण्याचा आदेश

पुणे – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरीने (महारेरा) दणका दिला आहे. करारात ठरल्याप्रमाणे सदनिकेचे पैसे देऊनही फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणात ग्राहकाला एका महिन्यात 1 कोटी 8 लाख रुपये परत करा, असे आदेश महारेराने दिला आहेत. एवढेच नव्हे, तर संबंधित रक्कमेवर फेब्रुवारी 2016 पासून 10.65 टक्के दराने व्याज आणि खर्चापोटी 20 हजार रुपये देण्याचेही आदेशत नमूद करण्यात आले आहे.

-Ads-

डीएसके यांच्याविरोधात “महारेरा’ने दिलेला हा पहिलाच निकाल आहे. फ्लॅटचा ताबा न दिल्याप्रकरणी मुंबई येथे राहणारे शब्बीर शामसी आणि त्यांच्या पत्नी आसमा यांनी डीएसकेडीएल या कंपनीविरोधात 31 जून रोजी याचिका दाखल केली होती. शामसी दाम्पत्याने फुरसुंगी येथील डीएसके ड्रीम सिटीतील यमुना रेसिडेन्सीमध्ये “बी-विंग’मधील 19 व्या मजल्यावरील 1 कोटी 49 लाख 84 हजार हजार रुपये किंमतीचा फ्लॅट बुक केला होता. त्यातील 1 कोटी 14 लाख 559 रुपये (स्टॅम ड्युटी व इतर खर्च) भरून सदनिका घेण्यासाठी डिसके आणि शामसी यांच्यात करार झाला होता. करारात 31 डिसेंबर 2017 पूर्वी फ्लॅट ताब्यात देण्यात येईल, तसेच सोसायटीमधील सर्व सुविधा देखील पुरविल्या जातील, असे नमूद होते. मात्र, बांधकाम पूर्णपणे बंद पडले असून मुदतीत सदनिकाच मिळाली नाही. त्यामुळे शामसी यांनी अॅड. सुदीप केंजळकर आणि अॅड. नीलेश बोराटे यांच्यामार्फत “महारेरा’कडे याचिका दाखल केली होती.

याबाबत अॅड. केंजळकर म्हणाले, “ठेविदारांची फसवणूक केल्याप्रकरणात डीएसके यांना अटक झाली आहे. तसेत त्यांनी दिलेल्या मुदतीत सदनिका मिळाली नाही. तसेच अटकेमुळे प्रकल्प कधी पूर्ण होईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही, असा युक्तिवाद करण्यात आला होता. तक्रारदार यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर डीएसकेडीएलने 10.65 टक्के दराने व्याजासह 1 कोटी 8 लाख रुपये परत करा, असे आदेश “महारेरा’ने दिले आहेत. दाव्याच्या खर्चापोटी 20 हजार रुपयांची रक्कम द्यावी. ही सर्व रक्कम 30 दिवसांत ग्राहकाला परत करावी,’ असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

डीएसकेंकडून कोणी आलेच नाही
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी डीएसके आणि त्यांच्या कंपनीकडून कोणीच हजर राहिलेच नाही. तारखांबाबत त्यांना मेल आणि पत्रांद्वारे कळविण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. बचाव पक्षाला पुरेसा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर प्राधिकरणाने थेट आदेश केले आहेत, असे बोराटे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)