डीएसके फसवणूक प्रकरण : सनदी लेखापाल घाटपांडे, अभियंता नेवासकर यांच्या जामिनावर सोमवारी (दि. 16 जुलै) सुनावणी

पुणे – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नेवासकर यांच्या जामिनावरील सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. येत्या सोमवारी (दि. 16 जुलै) दोघांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
घाटपांडे यांच्या वतीने ऍड. एस.के.जैन, ऍड. अमोल डांगे यांनी, तर नेवासकर यांच्या वतीने ऍड. रोहन नहार यांनी न्यायालयात बाजू मांडली. दोघांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली आहे. तर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडत दोघांच्या जामिनाला विरोध केला आहे. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद संपला असून, सोमवारी दोघांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)