डीएसके प्रकरण : ठेवी परत करण्याची मागणी

10 गुंतवणूकदार, सव्वा कोटींच्या ठेवी

पुणे – आजारपण आणि दैनंदिन गरजांसाठी पैशांची आवश्‍यकता असल्याने गुंतवलेले पैसे त्वरीत देण्यात यावेत, अशी मागणी करणारे अर्ज बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्याकडे ठेवी ठेवणाऱ्यांनी सत्र न्यायालयात केले आहे. 10 ठेवीदारांनी बुधवारी हे अर्ज दाखल केले.

अर्ज करणाऱ्या तक्रारदारांनी एकूण 1 कोटी 18 लाख 27 हजार रुपयांच्या ठेवी डीएसके यांच्याकडे ठेवल्या होत्या. गुंतवणूक केलेल्या पैशांचे आपण मूळ मालक आहोत. आजारपण आणि इतर कौटुंबीक कारणांसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे डीएसके यांनी पैसे परत करावे, अशी मागणी अर्जांत करण्यात असल्याची माहिती अर्जदारांचे वकील अॅड. सुदीप केंजळकर यांनी दिली.

अर्जदारांनी ठेवीस्वरुपात पैसे देताना दिलेले धनादेश नंबर अर्जात नमूद करण्यात आले आहेत. पैसे परत करण्यासाठी डीएसके यांच्याकडून चेक देखील देण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या खात्यात पैसेच नसल्याने संबंधित चेक जमा करण्यात आलेले नाही, असे अॅड. केंजळकर यांनी सांगितले. डीएसके यांनी कोर्टात जमा केलेले 6 कोटी 65 लाख रुपये आणि त्यांची महागडी वाहने विकल्यानंतर त्यातून जमा झालेली रक्कम ठेवीदारांमध्ये कशा पद्धतीने वाटता येईल, याचा आराखडा तयार करून सादर करावा, असा आदेश कोर्टाने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिला आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

पैसे पडून राहिले, तर त्यांचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे त्याचे वाटप कसे करता येईल याचा आराखडा कोर्टाने मागितला आहे. तपास अधिकारी आणि ठेवीदारांची समिती त्याबाबत काय अहवाल देणार यावर सध्या उपलब्ध असलेल्या रक्कमेचे वाटप होऊ शकते. तसेच अहवालावरून कोर्ट काय निकष काढेल, यावर देखील रक्कम वाटपाचा निर्णय अवलंबून आहे. अर्जदार डीएसके आणि याप्रकरणातील तपास अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे अॅड. केंजळकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)