डीएसके प्रकरण : जमा रक्कमेचे वाटप कसे करता येईल, याचा आराखडा सादर करा

न्यायाधीश दिलीप मुरूमकर पोलिसांना आदेश : क्‍लोजर रिपोर्टवर फिर्यादींनी 29 नोव्हेंबरपर्यंत म्हणणे सादर करावे

पुणे – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात न्यायालयात जमा असलेले 6 कोटी 65 लाख रुपये, त्यानंतर महागडी वाहने विकल्यानंतर त्यातून जमा झालेली रक्कम ठेवीदारांमध्ये कशा पद्धतीने वाटता येईल, याचा आराखडा तयार करून न्यायालयात सादर करावा, असा आदेश न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिला आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे.

-Ads-

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या तीन अधिकाऱ्यांच्या क्‍लोजर रिपोर्टबाबत मूळ फिर्यादींने म्हणणे सादर करावे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. अधिकाराचा गैरवापर करून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना वगळण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात क्‍लोजर रिपोर्ट सादर केला होता. याविरोधात गुंतणूकदारांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यावर म्हणणे दाखल करण्याचे आदेश न्यायालायाने मूळ फिर्यादी जितेंद्र नारायण मुळेकर यांना दिला होता.

त्यावर गुरुवारी युक्तिवाद होणार होता. मात्र, फिर्यादींनी अद्याप आपले म्हणणे सादर केले नाही. म्हणणे सादर करण्यासाठी आणखी 3 आठवडे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार 2 आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. सूनावणीसाठी डी. एस. कुलकर्णी, त्यांच्या पत्नी हेमंती, अनुराधा पुरंदरे आणि सई वांजपे यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. डीएसके यांची महागडी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याचा लिलाव करण्यात यावा. वाहने विकल्यानंर जमा झालेले पैसे आणि न्यायालायात जमा झालेले 6 कोटी 65 लाख रुपये ठेविदारांना देण्यात यावे, असा अर्ज त्यांचे वकील रवी श्रीकांत शिवदे यांनी केला होता. त्यावर न्यायालयाने आदेश दिला आहे की, जमा झालेली रक्कम ठेवीदारांमध्ये कशा पद्धतीने वाटता येईल, याचा आराखडा सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)