डीएसकेंना प्रा.लि. कंपनीच्या संपत्ती विक्रीचा अधिकार नाही

भागधारक चंदर भाटीया यांचा न्यायालयात अर्ज


12 तारखेला होणार त्यावर सुनावणी

पुणे- “डीएसकेडीएल’ ही प्राईव्हेट लिमिटेड कंपनी आहे. कंपनीच्या मालमत्तेची मालकी भागधारकांची असते. डीएसके वैयक्तीक कारणासाठी कंपनीची मालमत्ता विकू शकत नाही, याबाबत म्हणणे मांडण्यासाठी तिसरी पार्टी म्हणून न्यायालयात बाजू मांडण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज एका भागधारकाने न्यायालयात केला आहे. ऍड. प्रसाद कुलकर्णी यांच्यामार्फत हा अर्ज करण्यात आला आहे. यावर पुढील सुनावणीच्या वेळी 12 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. ठेवीदारांचे पैसे परतफेड करण्यासाठी “डीएसकेडीएल’ कंपनीच्या मालमत्तेची विक्री करण्याबाबतची तयारी त्यांच्याकडून दर्शविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर “डीएसकेडीएल’ कंपनीचे 39 लाख 50 हजार रुपयांचे भागधारक असलेल्या चंदर भाटीया यांनी ऍड. प्रसाद कुलकर्णी यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला आहे. जामिनावर सुनावणी पूर्वी “डीएसकेडीएल’ कंपनीची संपत्ती विकण्याच्या मुद्यावर तिसरी पार्टी म्हणून बाजू मांडण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज करण्यात आला आहे. यावर 12 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)