डीएसकेंच्या पुतणी, जावईसह चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे- गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके यांची पुतणी, जावई, सीईओ आणि सह वित्त विभागातील अधिकाऱ्याची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी हा आदेश दिला.
पुतणी सई केदार वांजपे, जावई केदार प्रकाश वांजपे, सीईआ धनंजय पाचपोर आणि वित्त विभागातील अधिकारी विनयकुमार बडगंडी अशी न्यायालयीन कोठडी झालेल्यांची नावे आहेत. दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीसके, त्यांची पत्नी हेमंती आणि मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे (वय 61, रा. धनकवडी) या तिघांनाही या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी डीएसके दांपत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर पुरंदरे हिला न्यायालयाने 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत जितेंद्र नारायण मुळेकर (वय 65, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली. गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी या चौघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने प्रथम चौघांना 25 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविली. त्यानंतर त्यांच्या पोलीस कोठडीत 29 मेपर्यंत वाढ करण्यत आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी चौघांना पुन्हा मंगलवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी काम पाहिले. तर बचाव पक्षातर्फे ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. शैलेश म्हस्के, ऍड. प्रसाद कुलकर्णी, ऍड. नंदू फडके यांनी युक्तीवाद केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)