पुणे – डीएसकेंनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात अटक केलेल्या चौघांना 25 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांनी दिला आहे. या प्रकरणात डीएसके दांपत्याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मुलगा शिरीषसह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल आहे. मुलगा शिरीषने जामिनासाठी अर्ज केला आहे.

डीएसके यांच्या भावाची मुलगी सई, जावई केदार प्रकाश वांजपे, धनंजय पाचपोर आणि सरव्यवस्थापक विनयकुमार बंडगडी या चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनुराधा रामचंद्र पुरंदरे, अश्‍विनी संजय देशपांडे, शिल्पा मकरंद कुलकर्णी, स्वरूपा मकरंद कुलकर्णी, तन्वी शिरीष कुलकर्णी आणि मकरंद सखाराम कुलकर्णी या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. डीएसके दांपत्याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. मुलगा शिरीष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या सई, केदार, धनंजय आणि बंडगडी या चौघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी चौघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)