डीएसकेंच्या जामिनावर उद्या (शुक्रवारी) सुनावणी

डीएसके पळून जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही – सरकारी पक्ष

पुणे- डीएसके यांना 50 कोटी रुपये जमा करण्यासाठी न्यायालयाने वेळोवेळी मुदत दिली होती. मात्र, ते पैसे भरू शकले नाहीत. ते केवळ दिशाभुल करत आले आहेत. ते जामिनावर सुटले तर काहीही करू शकतात. अगदी पळूनही जाण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही, यासाठी त्यांचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रदीप चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांच्या न्यायालयात डीएसके यांच्या जामिनावर उद्या (शुक्रवार दि. 27 एप्रिल) सुनावणी होणार आहे.

-Ads-

डीएसके यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी बचाव पक्षातर्फे ऍड. श्रीकांत शिवदे यांनी युक्तीवाद केला. त्यावेळी सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची वेळी मागीतली होती. त्यानुसार गुरुवारी सरकारी पक्षाचे वतीने ऍड. चव्हाण यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, आर्थिंक गुन्हा हा खूनापेक्षाही जास्त त्रासदायक असतो. पैशांच्या फसवणुकीत रक्त न सांडता कुटुंब उध्वस्त होते. डीएसके यांच्या कंपनीत काम करणा-यांना सुमारे 10 महिन्यांचा पगार मिळालेला नाही. डीएसके यांनी अस्तित्वात नसलेल्या फ्लॅटवर बॅंकेतील कर्मचा-यांना हाताशी धरून कर्ज काढले. तसेच त्यांनी पोलिसांना स्वत:हून पासपोर्ट दिलेला नाही. तर पासपोर्ट जमा करण्याची सुचना पोलिसांनी दिल्या होत्या. डीएसके यांचा पासपोर्ट पोलिसांकडे असला तरी त्यांचा मुलगा शिरीष आणि पत्नी हेंमती यांचा पासपोर्ट अद्याप त्यांच्याकडेच आहे. डीएसके यांचे सर्व प्रोजेक्‍ट पुर्ण झाले तरी त्यातून ठेविदारांना देण्यासाठी पैसे शिल्लक राहणार नाही, असा युक्तीवाद ऍड. चव्हाण यांनी केला.

बचाव पक्षातर्फे ऍड. शिवदे यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, डीएसके यांच्याकडे आत्ता पैसे नसले तरी त्यांचे प्रोजेक्‍ट पुर्ण करण्यासाठी अनेक पार्टी भागीदारी करण्यासाठी तयार आहेत. मात्र, आत्ताच्या वातावरणामुळे ते गुंतवणुक करण्यासाठी घाबरत आहे. तसेच त्यांनी गुंतवणूक करू नये यासाठी देखील काही गट सक्रीय आहे. डीएसके यांनी यापुर्वी देखील अनेक जणांच्या रक्कमा परत केल्या आहेत. उर्वरीत ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी आणि डीएसके यांच्या वयाचा व त्यांना असलेल्या आजाराचा विचार करून त्यांना 6 महिने जामीन देण्यात यावा. या काळात ते त्यांनी काही रक्कम परत केली नाही तर जामीन रद्द करावा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)