डीएसकेंच्या आणखी दहा अलिशान गाड्या जप्त

पुणे – सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायीक डी. एस. कुलकर्णी यांच्या गेल्या दोन दिवसांत मिळून 10 अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत डीएसके यांच्या इनोव्हा, इटीओस, कोरोला, क्वालिस अशा दहा अलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. डी. एस. कुलकर्णी हे त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णीसह न्यायालयीन कोठडीत आहेत.

यापूर्वी गेल्या महिन्यांत 26 फेब्रुवारी रोजी दोन बीएमडब्ल्यू, दोन टॉयोटा कॅमरी, एक पोर्श, एक एमव्ही ऑगस्टा, एक ऑडी क्‍यू-5 या परदेशी बनावटीच्या पाच कोटी रुपये किमतीच्या कार जप्त करण्यात आल्या होत्या. ठेवीदारांच्या मुदतठेवची रक्कम परत न केल्याबद्दल अडचणीत आलेले डीएसके यांच्याकडून दोन दिवसांत मिळुन दहा गाड्या जप्त केल्या आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी सांगितले, डीएसके यांच्या मालकीच्या पाच इनोव्हा, दोन इटीओस, एक कोरोला, एक क्वालिस, एक सेंट्रो या दोन दिवसांच्या कालावधीत जप्त करण्यात आल्या आहे. दरम्यान, डीएसके यांच्या जामिनाबाबत न्यायालयात 31 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)