डीएननगर-वांद्रे-मानखुर्द मेट्रो भूयारी करा

उच्च न्यायालयात याचिका
मुंबई – मेट्रोच्या कामामुळे शहरात होणारी वाहतूकीची कोंडी आणि ध्वनी प्रदुषणामुळे डीएननगर-वांद्रे-मानखुर्द मेट्रोचे काम भूयारी करा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने मेट्रो भूयारी असावी की नाही यावर आम्ही कोणताच निर्णय देऊन शकत नाही . परंतू एमएमआरडीए प्रशासनाने या संदर्भात एका आठवड्यात भुमिका स्पष्ट करावी असे निर्देश दिले.

मेट्रोच्या कामांमुळे वाढत्या वाहतूक कोंडीमुळे एच वेस्ट वॉर्ड सिटीझन ट्‌स्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने मेट्रोचे सुरू असलेल्या कामामुळे वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधताना ध्वनी प्रदुषणालाही रहिवाशांना समोरे जावे लागत असल्याने हा मार्ग भूयारी करण्याचे आदेश एमएमआरडीएला द्या अशी विनंती केली. याची दखल घेऊन न्यायालयाने एमएमआरडीए ला भुमीका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)