डीएड प्रवेशाला मुदतवाढ

30 जूनपर्यंत भरता येणार अर्ज : आतापर्यंत दहा हजार अर्ज

प्रभात वृत्तसेवा
पुणे- डीएलएड (डीएड) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून या प्रवेशाला याआधी 20 जूनपर्यंत मुदत दिली होती, मात्र आता ही मुदत वाढविण्यात आली असून 30 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. दरम्यान राज्यभरातून आतापर्यंत साधारण दहा हजार विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरला आहे. प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज करावेत, असे आवाहन डीएलएड प्रवेश समितीने केले आहे.
राज्य शासनाकडून शिक्षक भरती सुरू केल्यानंतर शिक्षकांना पुन्हा एकदा “अच्छे दिन’ येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी डीएडला प्रवेश मिळवणे हे दिव्य मानले जात होते; मात्र आता राज्यभरातून साधारण दहा ते पंधरा हजार विद्यार्थी बारावीनंतर डीएडचा पर्याय निवडताना दिसतात. मागील वर्षी राज्यातून 14 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा आतापर्यंत दहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. मात्र आता शिक्षक भरती करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर अखेर या पदविका अभ्यासक्रमाला पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, यावर्षी डीएलएड प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जास दि. 4 जूनपासून सुरू झाली आहे. शासकीय आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशही ऑनलाईन होणार आहेत. हे सर्व प्रवेश दि. 15 जुलैपर्यंत सुरू राहतील. दि. 16 जुलैनंतर डीएलएड प्रवेशाची लिंक सुरू राहणार नाही, अशी माहिती डीएलएड प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डीएलएड प्रवेश वेळापत्रक
* ऑनलाईन अर्जाची शेवटची मुदत : 30 जूनपर्यंत
* कागदपत्राची पडताळणी : दि. 1 जुलैपर्यंत
* प्राथमिक गुणवत्ता यादी : 3 जुलै रोजी
* प्रथम प्रवेशाची यादी : 4 जुलै
* दुसरी प्रवेशाची यादी : 11 जुलै
* तिसरी व अंतिम यादी : 16 जुलै

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)