डीईएस स्कूलमध्ये नाट्य प्रशिक्षण शिबिर

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डीईएस सेकंडरी स्कूल’मध्ये इनस्टिट्यूट ऑफ फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन’च्या (आयएफटी) सहकार्याने नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिर पूर्ण केलेल्या सहावी व सातवीतील ३२ विद्यार्थ्यांचा ‘अथांग’ नाट्य संस्थेचे प्रमुख सौरभ शाळिग्राम यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छमेव जयते’ हे मूकनाट्य आणि ‘म्याव म्याव निरंजन’ हे अंधश्रध्दा निर्मूलनावरील विडंबन नाट्य सादर केले.
अभिनयाकडे केवळ करिअर म्हणून न पाहता, छंद म्हणून तो जोपासावा असे मत  शाळिग्राम यांनी व्यक्त केले. अभिनय, संवाद, आत्मविश्‍वास, सभाधीटपणा आदी कौशल्ये विकसित व्हावी, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका सुजाता नायडू यांनी दिली. पल्लवी धिवार व गौरी देवळणकर यांनी संयोजन केले. ‘आयएफटी’चे संचालक गिरीश केमकर, डॉ. सविता केळकर, पर्यवेक्षिका ज्योती बोधे यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)