डीआरआयकडून 1.74 कोटींची रोकड, 10 किलो सोने जप्त

कोलकता – महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) येथील ज्वेलरच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले. या कारवाईवेळी 1 कोटी 74 लाख रूपयांची रोकड आणि 10 किलोहून अधिक सोने जप्त करण्यात आले.

डीआरआयने पश्‍चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सोने तस्करीला आळा घालण्यासाठी कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्याचाचा भाग म्हणून राजेंद्र दमानी उर्फ राजू दमानी या येथील ज्वेलरच्या कार्यालय, गोडाऊन आणि घरावर छापे टाकण्यात आले. या कारवाईवेळी मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने हस्तगत करण्यात आले.

जप्त करण्यात आलेले सोने तस्करीच्या स्वरूपातील असल्याची कबुली दमानीने दिली. त्याच्यासह चौघांना अटक करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात डीआरआयने आतापर्यंत संबंधित विभागात सुमारे 61 कोटी रूपयांचे 204 किलो सोने जप्त केले आहे. ते प्रामुख्याने बांगलादेश, म्यानमार, भूतान आणि चीनमधूून तस्करी करून आणले गेल्याचे स्पष्ट झाले. मागील आर्थिक वर्षात डीआरआयने संबंधित विभागात 110 कोटी रूपयांहून अधिक किमतीचे 430 किलो सोने हस्तगत केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)