डिहायड्रेशनची लक्षणे आणि उपाय

सध्या हवामानात बदल होत असून हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. यातच यंदा उन्हाळ्याची चाहुल लवकरच लागली आहे. या दिवसात अनेकजण डिहायड्रेशनचे शिकारी बनतात. वाढत्या उन्हाचा पारा तुम्हाला आजारी तर पाडतोच, शिवाय इतर अनेक समस्याही निर्माण होतात. ही काही लक्षणे तुम्हाला शरीरात पाणी कमी झाल्याचे सांगत असतात. याकडे वेळेवर लक्ष दिले तर तुमची डिहायड्रेशनपासून सुटका होऊन शकते…

डोके दुखणे -अचानक डोके दुखू लागणे किंवा जड झाल्यासारखे वाटणे. अशा वेळी दोन ग्लास पाणी पिऊन थोड्या वेळाने काहीतर खाल्ल्यास तुम्हाला यापासून आराम मिळेल.

थकवा – शरीरातील पाणी कमी झाल्यास तुमच्या डोक्‍याला ऊर्जा मिळत नाही. यावेळी तुम्ही काही कामात डोके घालत असाल तर तुम्हाला खूपच कमजोर वाटू लागते. यामुळे दिवसभरातून किमान 10-12 ग्लास तरी पाणी प्या.

डोळ्यांची जळजळ – पाण्याच्या कमतरतेने डोळ्यांतील कोरडेपणा वाढतो आणि त्याची जळजळ होते. यासाठी तुम्ही उन्हात जाताना गॉगल घालून बाहेर पडा.

पित्त – योग्य प्रमाणात पाणी न पिण्यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या होऊन पित्ताचा त्रास होऊ शकतो.

कोरडी त्वचा – डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी होते. तसेच चेहऱ्याचा ग्लो नाहीसा होतो.

युरिनचा रंग – याचा रंग बदलत असेल आणि तो डार्क पिवळा होत असले तर तुम्ही डिहायड्रेशनचे शिकारी होत आहात.

चक्कर येणे – पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. यामुळे तुम्हाला चक्कर येते.

या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही नियमितपणे भरपूर पाणी प्या, ताक, दही, फळांचे रस अशा द्रव्ययुक्त आहाराचा जेवणात समावेश करा. तसेच उन्हात जाणे टाळा, जर बाहेर जाणे गरजेचे असेल तर पाण्याची बाटली घेऊन जा. गॉगल, स्कार्फ, सनकोटचा वापर करा. या दिवसात शक्‍यतो लाईट रंगाचे किंवा पांढरे ड्रेस परिधान करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)