डिसेंबरमध्ये 53 जणांना डेंग्यूची लागण

पिंपरी – गेल्या वीस दिवसांपासून शहरातील वातावरणात बदल झालेला आहे. ताप, सर्दी, खोकल्याने शहरवासियांना बेजार केले आहे. त्यामध्ये, डेंग्यूच्या रुग्णांमध्येही दिवसें-दिवस वाढ होत असून डिसेंबर महिन्यात 53 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तसेच, जानेवारी महिन्यांपासून अद्यापपर्यंत 563 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असल्याची, माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दर महिन्याला डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात यंदा डेंग्यूच्या आजारांने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे कीटकजन्य आजारांमध्ये दिवसें-दिवस वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 4570 तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये, 859 संशयित रुग्णांपैकी 218 बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरामधील वाढत्या अस्वच्छतेमुळे कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी, शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरु असून डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय सुरु आहेत. हा आजार आटोक्‍यात आणण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, परिसरातील टायर, कुंड्या, पत्रे यासारख्या ठिकाणी पाणी साचल्यास आळ्या होण्याची शक्‍यता आहे. यामुळे, नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. डेंग्यू व मलेरिया आजार आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिका उपाययोजना करत असल्याचे, आरोग्य विभागाने सांगितले आहे.

रुग्णांना ताप आल्यानंतर लगेचच डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घराजवळ असलेल्या रिकाम्या भांड्यांमध्ये, कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावे. डेंग्यूच्या आजारावर प्रतिजैविक लस उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे वाटल्यास डॉक्‍टरांकडून शहानिशा करून त्वरित उपचार घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)