डिसेंबरपासून सुरु होणार बंगाल प्रीमियर लीग!

नवी दिल्ली : सध्या सुरू असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल आणि तामिळनाडू प्रीमियर लीग म्हणजे टीएनपीएलनंतर यावर्षी डिसेंबरपासून आणखी एक लीग सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या डिसेंबरपासून बंगाल प्रीमियर लीग सुरु होणार असल्याची माहिती पश्‍चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे.
या लीगसाठी आयएमजी-आरशी करार करण्यात आला असून मालिकेत एकूण सहा संघ असतील. मालिकेसाठी ईडन गार्डन्ससह तीन मैदाने निश्‍चित करण्यात आली असल्याचेही सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. पश्‍चिम बंगाल क्रिकेटच्या विकासासाठी ही लीग महत्वपूर्ण ठरेल. लीगसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया ऑगस्टमध्ये पार पडेल, असेही गांगुली यांनी सांगितले. दरम्यान आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची भारताकडे संधी आहे. दुखापतग्रस्त मनीष पांडेच्या ऐवजी संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकमुळे संघ व्यवस्थापनात फार फरक पडणार नाही, असे गांगुली यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)