डिव्हाईन स्टार्स, शेलार ग्रुप यांची विजयी सलामी

पहिली एक्‍सेल टी-20 महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे – डिव्हाईन स्टार्स, शेलार ग्रुप या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना पहिल्या एक्‍सेल टी-20 महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्‍सेल इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्‌स यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

धायरी येथील स्टार स्पोर्टस क्रिकेट अकादमी व व्हिजन स्पोर्टस क्रिकेट अकादमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आदिती गायकवाड (1-24 व 33धावा) हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने ईश्वरी ग्रुप संघाचा 8 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना डिव्हाईन स्टार्स संघाने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे ईश्वरी ग्रुप संघाला 20 षटकात 7 बाद 94 धावा करता आल्या.

निकिता आगेने सर्वाधिक 29 धावा केल्या. डिव्हाईन स्टार्स संघाकडून निकिता भोर (3-21), प्रिया सिंग (2-13), आदिती गायकवाड (1-24) यांनी सुरेख गोलंदाजी केली. डिव्हाईन स्टार्स संघाने 16.4 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 96 धावा करून विजय मिळविला. यात वैष्णवी रावलियाने 51 चेंडूंत 34 धावा व आदिती गायकवाडने 39 चेंडूंत 33 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. आदिती गायकवाड सामन्याची मानकरी ठरली.

दुसऱ्या सामन्यात सोनिया डबीरने केलेल्या नाबाद 75 धावांच्या जोरावर शेलार ग्रुप संघाने ट्रॅंटरचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ट्रॅंटर संघाने 20 षटकांत 3 गड्यांच्या बदल्यात 154 धावा केल्या. यामध्ये मुक्‍ता मोगरेने नाबाद 77 धावा, माधुरी आघावने 21 धावा, तर नेहा चावडाने 32 धावा केल्या. शेलार ग्रुपकडून वैष्णवी काळे 1-19, कोमल झंझाद(1-28), श्वेता खटाळ(1-32) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

शेलार ग्रुप संघाने 20 षटकांत 3बाद 155 धावा करून विजयाचे लक्ष्य पूर्ण केले. सोनिया डबीरने 50 चेंडूत 6 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सोनिया डबीरने कोमल झंझादने नाबाद 21 धावा, वैष्णवी काळेने 16 धावा, तेजश्री ननावरेने 14 धावा केल्या.

त्याआधी स्पर्धेचे उद्‌घाटन सुभेदार भोपाल सिंग, भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार नीलिमा जोगळेकर आणि एक्‍सेल इंजिनिअर्सअँड कन्सल्टंट्‌सचे चेअरमन संजय देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. एक्‍सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंट्‌सचे संचालक संदीप चिंचबनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना 51,000/-रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.

सविस्तर निकाल –

ईश्वरी ग्रुप- 20 षटकांत 7 बाद 94 धावा (निकिता आगे 29 (32), ऋतू भोसले 10 (6), निकिता भोर 3-21, प्रिया सिंग 2-13, आदिती गायकवाड 1-24) पराभूत वि. डिव्हाईन स्टार्स- 16.4 षटकांत 2 बाद 96 धावा (वैष्णवी रावलिया 34, आदिती गायकवाड 33, भरती फुलमाळी नाबाद 9, कृतिका टेकाडे नाबाद 8, मंजुश्री भगत 1-18); सामनावीर- आदिती गायकवाड;

ट्रॅंटर- 20 षटकांत 3 बाद 154 धावा (मुक्‍ता मोगरे नाबाद 77, माधुरी आघाव 21, नेहा चावडा 32, वैष्णवी काळे 1-19, कोमल झंझाद 1-28, श्वेता खटाळ 1-32) पराभूत वि. शेलार ग्रुप- 20 षटकांत 3 बाद 155 धावा (सोनिया डबीर नाबाद 75, कोमल झंझाद नाबाद 21, वैष्णवी काळे 16, तेजश्री ननावरे 14, आदिती जोशी 1-9, ज्योती शिंदे 1-16, संजना शिंदे 1-23); सामनावीर- सोनिया डबीर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)