पिंपरी – पोल्ट्री फार्मच्या कॅशियरचीच रोकड लंपास करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला वाकड पोलिसांनी बेड्‌या ठोकल्या.

साकीरआलम जेहरूल हक (वय-21, रा. सोनवणे वस्ती जवळ, ताथवडे. मूळ रा. बगलबारी, किशनगंज बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अराफत अस्लम शेख (वय-20, रा. सोनवणे वस्ती जवळ, ताथवडे) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मोमीन ट्रेडर्स ताथवडे येथे पोल्ट्री फार्ममध्ये कॅशियर म्हणून नोकरी करतात. तर हक हा तिथेच डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. शेख हे व्यवसायाची 70 हजार रुपयांची रोकड डोक्‍याखाली घेऊन झोपले होते. हक याने संधी साधून ही बॅग घेऊन पोबारा केला. झोपेतून जाग आल्यानंतर शेख यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ वाकड पोलिसांत धाव घेतली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन, पोलीस उप निरीक्षक हरीश माने, तपास पथकातील शाम बाबा, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, प्रमोद कदम, मोहम्मदगौस नदाफ, अशोक दुधवणे, सुरेश भोसले, धनराज किरनाळे, दादा पवार, रमेश गायकवाड, विजय गंभीरे, विक्रम कुदळे, राजेश बारशिंगे, नितीन गेंजगे, मधुकर चव्हाण, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)