‘डिलिव्हरी चार्जेस’च्या नावे लुटीचा धंदा

दररोज हजारो रुपयांची वसुली : गॅस कंपन्यांचेही दुर्लक्ष

पुणे – घरपोच गॅस सिलिंडर देणाऱ्या व्यक्तीकडून डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली 5 ते 50 रुपयांपर्यंतची रक्कम ग्राहकांकडून वसूल केली जात आहे. ग्राहकांना घरपोच सिलिंडर देणे आणि पावतीनुसारच सिलिंडरचे बिल घेणे बंधनकारक असताना डिलिव्हरी बॉयकडून अधिक पैसे घेण्याचे प्रकार घडतात. यातून दररोज हजारो रुपयांची वसुली होत असून हा ग्राहकांच्या खिशावरच डल्ला मारण्याचा प्रकार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गॅस सिलिंडर हा जीवनाश्‍यक वस्तूंपैकी एक आहे. गॅस सिलिंडर वेळेवर नाही मिळाला, तर स्वयंपाक करणे अवघड होते. त्यामुळे गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. गॅस कंपन्यांकडून आता ऑनलाइन बुकिंगद्वारेच नोंदणी घेतली जाते. त्यानंतर गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. डिलिव्हरी बॉय घरी सिलेंडर देताना बहुतेक वेळा पावती देत नाही. त्यामुळे गॅस सिलिंडरची किंमत ग्राहकांना कळत नाही. डिलिव्हरी बॉय सांगतील, ती किंमत ग्राहक देतात. यामध्ये डिलिव्हरी बॉयकडून बिलापेक्षा 5 ते 50 रुपये अधिक घेतात. गॅस सिलेंडर परत गेला तर मिळणार नाही, या भीतीने ग्राहक डिलिव्हरी बॉय सांगतील ती रक्कम देण्यास तयार होतात. डिलिव्हरी बॉयने सिलेंडर दिल्यानंतर त्याची नोंद कार्डवर करतो. मात्र, पैसे किती दिले त्याची नोंद होत नाही. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत ग्राहक अनभिज्ञ राहतात.

ग्राहकांनो, लूट झाल्यास “हे’ कराच
शहरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तीन तेल कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. डिलिव्हरी बॉयने सिलिंडरचे जादा पैसे मागितल्यास त्याची तक्रार संबधित गॅस एजन्सीकडे करावी. गॅस एजन्सीनेही याची दखल न घेतल्यास या कंपन्यांच्या कॉल सेंटरशी संपर्क करून. याची तक्रार नोंदवा. संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम वरिष्ठ अधिकारी अनघा गद्रे यांनी दिली.

दरमहा मिळणाऱ्या सबसिडीमध्ये तफावत
गॅस सिलेंडरची सबसिडी थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होते. दरमहा जमा होणाऱ्या सबसिडीमध्ये तफावत असते. यामुळे ग्राहकांच्या मनात शंका उपस्थित होते. मागील महिन्याला जास्त सबसिडी होती. या महिन्यात कमी सबसिडी आली, असे प्रश्‍न ग्राहक उपस्थित करतात. याविषयी अनघा गद्रे म्हणाल्या, “गॅस सिलिंडरचे दर महिन्याच्या एक तारखेला बदलत असतात. त्यामुळे या दरानुसार सबसिडीचे दरही बदलत असतात. त्यामुळे सबसिडीमध्ये तफावत दिसते.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)