डिझेल स्वस्त; तरीही पीएमपीला “चिंता’

PMPML, Pune

जुन्याच दरानेच करावे लागतेय खरेदी : दर कपातीचा होईना फायदा

पुणे – केंद्र आणि राज्य शासनाने मिळून डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात केल्याने गेल्या तीन-चार दिवसांत राज्यातील डिझेलचा दर 4 रुपये 6 पैशांनी कमी झाला आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाचा फायदा पीएमपीला होत नसल्याने जुन्या दरानुसारच डिझेल खरेदी करावे लागत आहे. पीएमपीला डिझेल पुरवणाऱ्या कंपनीकडून दर पंधरा दिवसांना रकमेत बदल केला जात असल्याने हा फटका बसत असून येत्या 15 ऑक्‍टोबरला हा बदल केला जाणार आहे. यामुळे पुढील सात दिवस पुर्वीच्या दरानेच डिझेल खरेदी करावे लागणार आहे.

पीएमपीला रोज लागणारे डिझेल 

38 हजार लिटर


डिझेलसाठी रोज लागणारा खर्च 

28 लाख 50 हजार

पीएमपीच्या ताफ्यात 800 पेक्षा जास्त बसेस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. यासाठी 38 हजार लिटर डिझेल प्रतीदिन खरेदी करावे लागते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पीएमपीला 68.75 रुपये प्रतीलिटर दराने डिझेल उपलब्ध होत होते. आता यात कमालीची वाढ झाली असून आज 75 रुपये प्रतीलिटर दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. यातच केंद्र आणि राज्य शासनाने मिळून गेल्या दोन दिवसांत डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात करून ते कमी केले. यामुळे शनिवारपासून (दि.6) राज्यात प्रतिलिटर 4 रुपये 6 पैशांनी स्वस्त झाले आहे. मात्र, सद्यपरिस्थीत पीएमपीला या निर्णयाचा फायदा होत नसून मिळणाऱ्या दरात कपात झाली नाही. हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीकडून पीएमपी डिझेल खरेदी करते. दररोज 38 हजार लिटर डिझेल खरेदी केले जात असल्याने कंपनी लिटरमागे 80 पैशाची सुट देते. मात्र, कंपनीकडून दर पंधरा दिवसांना रकमेत बदल केला जातो. यामुळे येत्या 15 ऑक्‍टोबर रोजी हा बदल केला जाण्याची शक्‍यता असल्याने तोपर्यंत पुर्वीच्याच दराने डिझेल खरेदी करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)