डिझेल दरवाढीची शेतकऱ्यांना झळ

आर्थिक ताळेबंद सांभाळताना करावी लागतेय तारेवरची कसरत

सातारा, दि. 11 (प्रतिनिधी) – शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होत असताना आता त्यात डिझेल दरवाढीची भर पडली आहे. त्यामुळे आर्थिक ताळेबंद सांभाळताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने हा तोटा सहन करावा लागत आहे.
देशात इंधनाचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेले दहा ते बारा दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढतच आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. राज्यात मंगळवारी डिझेलचा दर प्रतिलिटर 76 रुपये 16 पैसे आहे. गेल्या दहा दिवसांची आकडेवारी पाहाता त्यात तब्बल तीन रुपयांनी वाढ झाली आहे.
डिझेल महागल्याने त्याचा थेट फटका शेतीला बसणार आहे. ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी डिझेल पंपमोटारचा वापर केला जातो. त्यासाठी रोज पाच ते दहा लिटर डिझेल लागत लागते. सातत्याने होणाऱ्या दरवाढीने हा खर्च वाढत आहे. त्याचबरोबर मशागतीसाठी बैल जोड्यांऐवजी ट्रॅक्‍टरचा वापर होत आहे. ट्रॅक्‍टरसाठीही डिझेल लागते, त्याचबरोबर शेतमाल बाजार समितीमध्ये घेवून जाण्यासाठी वाहतूक खर्चही वाढला आहे. आधीच उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बियाणे, खते, शेतमजूर यांचा खर्च भागवताना मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या माथी इंधन दरवाढ आली आहे. याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. ज्याप्रमाणे उत्पादन खर्च वाढत आहे, त्यातुलनेत उत्पन्न मात्र मिळत नाही. केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केला असला तरी बाजारात डाळी, तेलबिया, अन्नधान्य आणि अन्य कृषी मालांची विक्री एमएसपीपेक्षा कमी भावाने होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)