डिझेलच्या दरामध्ये अभूतपूर्व वाढ…

प्रति लीटर 69.46 रुपये


प्रति लीटर 78 रुपयांच्या दिशेने भाववाढ सुरू

नवी दिल्ली – डिझेलचे दर आज लीटर मागे 14 पैशांनी तर पेट्रोलचे दर लीटरमागे 13 पैशांनी वाढले. या भाववाढीमुळे डिझेलचे भाव आतापर्यंतचे सर्वाधिक प्रति लीटर 69.46 रुपये झाले आहेत. रुपयाच्या घसरणीमुळे डिझेल आयात महाग झाल्याचा परीणाम म्हणून डिझेलचे दर प्रति लीटर 78 रुपये होण्याची शक्‍यता आहे.

डिझेलचे भाव यापूर्वी कधीही इतके जास्त झालेले नव्हते. दिल्लीमध्ये डिझेल प्रति लीटर 69.46 रुपये इतके तर मुंबईमध्ये 73.74 रुपये इतके झाले आहेत. विक्री कर किंवा “व्हॅट’ कमी असल्याने राजधानीच्या इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील डिझेलचे भाव सर्वात स्वस्त आहेत. स्थानिक विक्री करांच्या प्रमाणात प्रत्येक राज्यातील भाव वेगवेगळे असतात. दिल्लीत पेट्रोलवर 27 टक्के तर मुंबईत सर्वाधिक 39.12 टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट)लागू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्लीतल्या डिझेलची किंमत यापूर्वी 29 मे रोजी सर्वाधिक म्हणजे 69.31 रुपयांपर्यंत वाढली होती. पेट्रोलचा दर दिल्लीत 77.91 रुपये तर मुंबईत 85.33 रुपये इतका वाढला. यापूर्वी 29 मे रोजी हेच दर दिल्लीमध्ये 78.43 रुपये आणि मुंबईमध्ये 46.24 रुपये इतके जास्ती होते.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण 16 ऑगस्ट रोजी झाल्यापासून इंधनाच्या किंमतीमध्ये वाढ व्हायला लागली आहे. गेल्या 12 दिवसात दिल्लीत पेट्रोलच्या दरामध्ये 0.77 रुपयांनी तर डिझेलच्या दरामध्ये 0.74 रुपयांनी वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)