डिजे, डॉल्बी, गुलालमुक्‍त उत्सव साजरा करा

अजित देशमुख ः ओतूर पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमिवर बैठक
ओतूर  -गणेश मंडळांनी डिजे, डॉल्बी, गुलालमुक्‍त, ध्वनी प्रदूषण विरहित उत्सव साजरा करावा, सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांना वाव द्यावा. स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामसभा घेऊन “एक गाव एक गणपती’ उत्सव साजरा करण्यासाठी निर्णय घ्यावा. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करून वृक्षारोपण, सार्वजनिक वाचनालयांना आर्थिक मदत यासारखे विधायक उपक्रम राबवावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी केले.
गणेशोत्सवाच्या व दहीहंडीच्या पूर्वतयारीसाठी ओतूर (ता. जुन्नर) येथील पोलीस ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, तहसीलदार किरण काकडे, ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, उपनिरीक्षक एस. एम. शेख, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले आदी मान्यवर उपस्थिती होते.
याप्रसंगी देसाई म्हणाल्या की, गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा, महिला व मुलींचे छेडछाडीचे प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी. ध्वनीक्षेपकावर अश्‍लील गाणी लावू नये. मंडळांना पोलीस विभागाच्या वतीने बक्षीसे देण्यात येतील, नशा पाणी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांची आरटीओकडून तपासणी करून घ्यावी. मिरवणुकीत प्रक्षोभक घोषणा देऊ नये. विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करावी, उत्सव आनंदात साजरा करावा. यावेळी शांताराम गायकर, तान्हाजी तांबे, निलेश महाले, अंकुश आमले, सोनल डुंबरे यांनी मनोगते व्यक्‍त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज बनसोडे यांनी केले. तर सूत्रसंचालन मंगेश फाकटकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)